Sunday, June 20, 2010

This one's for you Baba

Happy Father's Day, I love you :)

--  कणा --
"ओळखलत का सर मला" - पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी,
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
"गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, 
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली,
भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले,
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे",
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
"पैसे नको सर, थोडा एकटेपणा वाटला -
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा  
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा"
- कुसुमाग्रज

असेल ही तुझी कथा, आहे ही तुझीच गोष्ट,
आयुष्यातल्या चढ उतारातून दाखविलेस तुझे वैशिष्ट,
मोजकी ती नाती गोती, मोजकेच ते मित्र,
जीवनेतल्या आशाने हरू नाही दिले मात्र,
शिकले आहे तुझ्याकडून भरारी मारायला,
निघाले आहे तुझ्याच वेगाने जग जिंकायला,
येतील अडथळे त्या वाटेवर,
अर्थातच असेल तुझा हात पाठीवर,
पण नाही पुरणार नुसते लढ म्हणा,
कारण बाबा तूच तर माझा कणा
- आदू माकड  :)  

No comments:

Post a Comment